🪷
🪷

॥ जय कराडी ॥

सर्व कराडी समाज बंधु भगिनींना सस्नेह नमस्कार

महाराष्ट्रामध्ये जवळपास ३ जिल्ह्यामध्ये कराडी समाजाचे वास्तव्य आहे. तसेच औरंगाबाद, पुणे येथे काही कुटुंब वास्तव्यास आहेत. कराड सातारा करा नदी या जिल्ह्यातुन या कराडी समाजाची स्थलांतर झाल्याची माहीती मिळते. वास्तविक आज ३ जिल्ह्यामध्ये समाज विखुरला असल्याने या समाजाचे सक्रीय कार्यकर्ते या ३ जिल्ह्यामध्ये आहेत. मात्र युवक व युवती कार्यरत नसल्याने त्यांना सक्रिय करण्याची कार्यकर्त्याने जबाबदारी घेतलेली आहे. कार्यकर्ते आणि समाज बांधव सक्रीय व्हावे या उद्देशाने युवक युवती परिचय संमेलन या ३ जिल्ह्यामध्ये घेण्याचे प्रयोजन आहे. आणि केले जाणार आहे. या आधी मेळावे झाल्याचे समजते. मात्र त्या मेळाव्यांचा प्रचार झाला पण सदर मेळाव्यात यूवक यूवतीनी सक्रीय भाग घेतल्याचे दिसत नाही. तरी आताच्या समाज कार्यकर्त्यानी केंद्र शासनाच्या निती आयोग नियमाने काही माहीती आधारीत माहीती देणेकामी कराडी समाजाकडुन बरेचसे कार्यक्रम राबविले जात नाहीत. सर्व प्रथम युवक युवतींची समाजाकडे अधिकृत नोंदणी होणे आवश्यक आहे. म्हणून २०२६ हे वर्ष आधारभूत म्हणून वधु व वर कराडी समाज जीवन साथी हे वेबसाईट रजिस्टर करण्याचे समाजाने ठरविले आहे व याच वेबसाईट चे उदघाटन समाजाच्या बंधु भगिनी यांना गावोगावी जावून व रायगड, मुंबई ठाणे या जिल्हयातील दैनिक वर्तमान पत्रात जाहिरात बातमी देवून या वेबसाईट चे उदघाटन करण्याचे ठरविले आहे. सदर वेळी परिचय संमेलन निमित्ताने सोयरिक पुस्तकाबाबत चर्चा सुदधा होणार आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात आई वडीलांना आपल्या मुला मुलींसाठी योग्य स्थळ शोधणे अवघड झाले आहे म्हणून वधु वर जीवन साथी वेबसाईट व सोयरिक पुस्तकांचे नियोजन या माध्यमातून महाराष्ट्रासह ३ जिल्हयातील उपवर युवक युवतींना अनुरूप जोडीदार सोधण्यात नक्की मदत होवून सर्वांचा वेळ पैसा श्रम वाचणार आहे. व सदर वधु वर जीवन साथी वेबसाईट व सोयरिक पुस्तकेच्या माध्यमातून उपवर युवक युवतींना योग्य मनपसत जोडीदार मिळो अश्या सुभेच्छा समजाकार्यकारणी कडून देण्यात येत आहेत. आज समाजासमोर अनेक समस्या निर्माण होत आहेत. समाजातील मुलामुलीचे प्रमाण अत्यांत विषम झाले आहे. त्यामुळे अनेक तरूणांना लग्नासाठी इतर समाजाची वाट धरावी लागत आहे. कारण समाजाकडे सुदधा मुलींची संख्या कमी आहे व मुली या शैक्षणिक दृष्टया मुलांपेक्षा अधिक असल्याने त्यांना त्यांच्या योग्यतेचा वर मिळत नाही ही सुद्धा मोठी खंत आहे. त्यामुळे समाजामध्ये मुलीचा जन्म होताच तिचे स्वागत करूया व सध्या समाजामध्ये विवाह जुळवत असताना घटस्पोटाचे प्रमाण हे सुदधा प्रत्येक समाजाची चिंतेची बाब बनली आहे. यासाठी समाजातील सुज्ञ मंडळींनी लक्ष घालून हे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. तसेच युवकांमधील वेसनधिनता आणि उरमठपणा वाढीची शक्यता वाटत आहे. यासाठी मुलांवर लहानपणा पासून योग्य संस्कार करून त्यांना यापासून परावृत्त करू या समाजात तसे पाहिल तर हुंडा पध्दत कराडी समाजात १०० टक्के नाही व बाळ विवाह सुदधा काळबाहय रूढी परंपरा अशा प्रथांना सुदधा या समाजामध्ये थारा नाही. यासाठी सावित्रिबाई फुले, महात्मा फुले, श्री छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुरोगामी विचार समाजात रूजविणे आवश्यक आहे. सध्या कराडी समाजामध्ये मुला मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत असले तरी बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. तरुणांनी केवल नोकरीच्या मागे न लागता केंद्र शासनाच्या नवीन नियम धोरणामुळे छोटे मोठे उदयोग धंदे सामाजिक संस्था, सामाजिक मंडळे महिलांनी सुदधा छोटे मोठे धंदे बचत गटे असे व्यवसाय केंद्र शासनाला धरून नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. समाजाच्या स्तरावर सध्या केंद्र शासनाने १५ संघटना रजिस्टर करण्याचे धेय ठेवलेले आहे. तरी राजाश्रयाशिवाय कोणताही समाज प्रगती करू शकत नाही. त्यासाठी तरूण युवकांनी व युवतींनी राजकीय साक्षरता वाढविणे आवश्यक आहे. तरूण तरूणी यांनी समाज कारणासोबतच राजकारणत सुदधा सहभाग घेतला पाहीजे कारण 'ओबीसी' चा एक मोठा घटक म्हणून आपले हक्क आणि अधिकार याबाबत जागृत राहिले पाहिजे यासाठी संघटित होवून चळवळ उभी केली पाहिजे. पुनश्चा एकदा उपवर युवक युवतीना योग्य जोडीदार मिळा यासाठी सुभेच्छा देतो आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणा-या सर्व पदाधिकारी व समाजबांधवांचे मनापासून आभार मानतो.

समाजाचे सर्व पदाधिकारी

कराडी समाज मंडळ महाराष्ट्र